काळजी घेणे, जबाबदारी स्वीकारणे, सन्मान करणे आणि समजून घेणे हे प्रेमाचे चार पैलू आहेत.
जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ एरिक फ्रॉम यांचे ‘द आर्ट ऑफ लव्हिंग’ हे पुस्तक जगातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे आणि त्याच्या आजवर लक्षावधी प्रती खपल्या आहेत. प्रेमासाठी प्रत्येक माणूस आतून आसुसलेला असतो. कारण खरे प्रेम हाच मानवी अस्तित्वाच्या मूळ समस्येवर एकमेव तोडगा आहे, माणसाचे आंतरिक दुःख व एकाकीपणावरील उत्तर आहे. पण प्रेम म्हणजे तरी मुळात काय?.......